टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा |Tap Tap Takit Tapa Chale Maza Ghoda / - शांता शेळके

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा

पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके 
SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment