लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा |श्री शंकराची आरती ( Shanakarachi #Aarati )

Shankarachi Aarati
श्री शंकराची आरती ( Shanakarachi Aarati )

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा |
वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा |
लावण्यसुंदर मस्तकी बाळा |
तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा || ||

जय देव जय देव जय श्रीशंकरा
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा || धृ ||

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा |
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा |
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा |
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा | जय देव || ||


देवी दैत्यी सागर मंथन पै केले |
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले |
तें त्वां असुरपणे प्राशन केलें |
 नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले | जय || ||

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी |
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी |
 शतकोटीचे बीज वाचे उच्चारी |

रघुकुळटिळक रामदासाअंतरी || जय देव || ||
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment