deva tujhe kiti sundar akash lyrics / देवा तुझे किती सुंदर आकाश -- गणेश हरि पाटील

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील

-- गणेश हरि पाटील
SHARE

About shubh

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment