कळत नकळत (Zee Marathi TV serial title song Lyrics)

Song :- सारे कळत नकळतच घडते
Tv Serial :- कळत नकळत
Lyrics :- अश्विनी शेंडे
Music :- निलेश मोहरीर
Singers :- वैशाली सामंत





मन होई फुलांचे थवे गंध हे नवे कुठुनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्‍ने ओली हुळहुळणारी माती
मन वार्‍यावरती झुलते, असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते-
सारे कळत नकळतच घडते

कुणीतरी मग माझे होईल हात घेउनी हाती
मिठीत घेऊन मोजू चांदण्या काळोखाच्या राती
उधळून द्यावे संचित सारे आजवरी जे जपले
साथ राहू दे जन्मोजन्मी असेच नाते अपुले

पण कसे कळावे कुणी सांगावे आज-उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते पाऊल का अडखळते
वाहत-वाहत जाताना मन क्षितिजापाशी अडते
परि पुन्हापुन्हा मोहरते-
सारे कळत नकळतच घडते
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment