नसतेस घरी तू जेव्हा (अल्बम - आयुष्यावर बोलू काही)

गीत :- नसतेस घरी तू जेव्हा
गीतकार  - संदीप खरे
संगीत - संदीप खरे,सलील कुलकर्णी
स्वर - सलील कुलकर्णी
अल्बम - आयुष्यावर बोलू काही
नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकुन वारा
तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघववेळा
श्वासांविण हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो!
SHARE

About Sushant

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment